Friday, June 2, 2023

4 शतकांसह Jos Buttler ने रचला इतिहास, दिग्गजांनाही टाकले मागे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये जॉस बटलरने (Jos Buttler) पुन्हा एकदा आपल्या बॅटने कमाल केली आहे. काल झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात बटलरने (Jos Buttler) वादळी शतक केलं, त्याने 60 बॉलमध्ये नाबाद 106 रनची खेळी केली, यामध्ये 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं बटलरचं हे चौथं शतक आहे. बटलरच्या या शतकामुळे राजस्थान यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे.

सर्वाधिक शतक करणारा दुसरा खेळाडू
आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये शतक करणारा बटलर (Jos Buttler) सहावा खेळाडू ठरला आहे. बटलरच्या अगोदर सेहवाग, वॉटसन, ऋद्धीमान साहा, मुरली विजय, रजत पाटीदार यांनी प्ले-ऑफमध्ये शतकं केली होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये बटलर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 6 शतकं क्रिस गेलच्या नावावर आहेत. तर विराट कोहली आणि बटलरने प्रत्येकी 5-5 शतकं केली आहेत. तसेच आयपीएलमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक 4 शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाबरोबर बटलरने बरोबरी केली आहे. विराटनेसुद्धा 2016च्या आयपीएलमध्ये 4 शतकं केली होती.

बटलरने गाठला 800 चा आकडा
जॉस बटलरने (Jos Buttler) आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 800 रनचा टप्पा पार केला आहे. 16 सामन्यांमध्ये त्याने 150.64 च्या स्ट्राईक रेटने आणि 58.43 च्या सरासरीने 818 रन केले आहेत. यामध्ये 4 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने या मोसमात 78 फोर आणि 44 सिक्स लगावले आहेत. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 2016 च्या आयपीएलमध्ये 973 रन केले होते. या यादीत 848 रनसह डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरचा विक्रम मोडायला बटलरला आणखी 31 रनची तर विराटचा विक्रम मोडायला 156 रनची गरज आहे.

हे पण वाचा

एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल