बुमराहने शेवटच्या सामन्यात तीन विकेट घेऊन मलिंगाच्या ‘त्या’ रेकॉर्डशी केली बरोबरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 मधील शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत त्यांचे प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आणले. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) जोरदार बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या. यासह त्याने लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 19 वेळा 3 विकेट्स घेणारा बुमराह (Jaspreet Bumrah) हा मलिंगानंतर दुसरा बॉलर ठरला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी बॉलर लसिथ मलिंगाने 19 वेळा 3 विकेट्स घेतल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बुमराहनं (Jaspreet Bumrah) दिल्लीला मोठा स्कोर करण्यापासून रोखलं. त्यानं ‘पॉवर प्ले’ मध्ये पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांना आऊट केलं. तर त्यानंतर धोकादायक रोव्हमन पॉवेलची विकेट घेतली. बुमराहनं या सामन्यात 25 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या. याचबरोबर त्यानं त्याचा माजी सहकारी लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मलिंगानंतर आयपीएलमधील एका सामन्यात 3 विकेट्स घेण्याच्या यादीत अमित मिश्राचा नंबर आहे. त्यानं 17 वेळा 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो आणि उमेश यादव यांचा नंबर आहे. त्यांनी प्रत्येकी 16 वेळा हा रेकॉर्ड केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बुमराह फार काही कमाल करू शकला नाही. त्याने 14 सामन्यांत 383 रन देत 15 विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध 10 रन देऊन 5 विकेट्स ही बुमराहची या आयपीएलमधील तसेच कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Leave a Comment