मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य

Rohit Sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचा आयपीएल सीझन मुंबईसाठी खूपच निराशाजनक राहिला आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने आतापर्यंत झालेल्या 12 मॅचपैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत तर 9 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईची कामगिरी या मोसमात लाजिरवाणी झाली असली तरी 19 वर्षांच्या तिलक वर्माने (Tilak Varma) या मोसमात आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला आयपीएल लिलावामध्ये 1.70 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. तिलक वर्माला (Tilak Varma) विकत घेण्यासाठी मुंबई आणि सीएसके यांच्यात चढाओढ सुरु होती. पण अखेर मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

तिलक वर्माने आयपीएलच्या या मोसमात 12 सामन्यांमध्ये 40.89 ची सरासरी आणि 132.85 च्या स्ट्राईक रेटने 368 रन केले आहेत, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तिलक वर्मा यंदाच्या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. तिलक वर्माची ही कामगिरी बघून मुंबई आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप प्रभावित झाला आहे. तसंच तो लवकरच भारताकडून खेळेल, असा विश्वाससुद्धा रोहित शर्माने व्यक्त केला आहे.

‘तो हुशार आहे. पहिल्याच वर्षी डोकं एवढं शांत असणं सोपं नाही. लवकरच तो भारतासाठी सगळ्या फॉरमॅटमध्ये खेळेल, त्याच्याकडे टेकनिक आणि टेम्प्रमेंट आहे, त्याच्यासाठी भविष्य उज्वल दिसत आहे, तसंच त्याच्यात भूकही आहे,’ असं वक्तव्य रोहितने काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर केले आहे. चेन्नईने दिलेलं 98 रनचं आव्हान पार करताना मुंबईची चांगलीच दमछाक झाली मात्र तिलक वर्माने एका बाजूने खिंड लढवून मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात तिलक वर्माने (Tilak Varma) 32 बॉलमध्ये नाबाद 34 रनची खेळी केली.

हे पण वाचा :
Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!

Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ

‘या’ नंबरची नोट मिळवून देईल लाखो रुपये !!!

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड

भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ???