IPL 2024 चा अंतिम सामना ‘या’ स्टेडियमवर खेळवण्यात येणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL 2024 ला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ३ सामने झाले आहेत. भारतात यंदा लोकसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयपीएल २ टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त 21 सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल असं बोललं जात आहे. मात्र आता यावर्षीची आयपीएल फायनल कुठे खेळवण्यात येईल याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कुठे होईल आयपीएलचा अंतिम सामना – IPL 2024

यंदाच्या आयपीएलचा (IPL 2024) अंतिम सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एक क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल तर तर दुसरा क्वालिफायर सामना आणि अंतिम सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. २६ मे ला हा अंतिम सामना खेळवण्यात येईल असेही बोललं जात आहे. मात्र याबाबत अजून तरी कोणीतरी अधिकृत घोषणा बीसीसीआय कडून करण्यात आलेली नाही.

धोनीच्या चाहत्यांमध्ये उत्साह –

देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्सची आण- बाण आणि शान असलेल्या महेंद्रसिग धोनीची यंदाची आयपीएल शेवटची असू शकते. धोनीने नुकतंच आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देत निवृत्तीबाबत संकेत दिले आहेत. अशावेळी धोनीसाठी आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईतून पाहायला मिळावा अशी चाहत्यांची इच्छा असल्याचं त्यात नवल नाही. जर आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत खेळवण्यात आला आणि धोनीची चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये पोचली तर फक्त चेन्नईच्याच नव्हे तर देशभरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी हा सामना पाहणे अत्यंत भावनिक असेल.