IPL 2024 Playoffs : मुंबई- बंगळुरू IPL मधून OUT; प्लेऑफ साठी ‘या’ 5 संघामध्ये मुख्य चुरस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ कडे (IPL 2024 Playoffs) सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्ले ऑफ मध्ये कोणते ४ संघ धडक मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य आहे. आत्तापर्यतचे पॉईंट टेबल बघितलं तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे २ संघ आयपीएल मधून जवळपास बाहेर पडले आहेत. तर दिल्ली कपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि गुजरात टायटन्स हे ३ संघ दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. तर राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या ५ संघांपैकी ४ संघाना प्लेऑफ मध्ये पोचण्याची संधी दिसत आहे.

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने यंदा आपल्या चाहत्यांना निराश केलं आहे. दोन्ही संघानी आत्तापर्यंत एकूण १० सामन्यात प्रत्येकी ३ विजय मिळवले आहेत तर ७ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आता जरी या दोन्ही संघानी आपले उर्वरित सामने जिंकले तरी त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील म्हणजे ते प्ले ऑफ पर्यंत जाणे जवळपास अशकय म्हणता येईल. यानंतर दिल्ली कपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि गुजरात टायटन्स यांचे भविष्य दुसर्याच्या हातात आहे. या तिन्ही संघानी आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते १६ गुणापर्यंत पोचू शकतात. मात्र प्ले ऑफमध्ये (IPL 2024 Playoffs) धडक मारण्यासाठी इतर संघाचे पराभव आणि नेट रनरेट या गोष्टी या संघाला बघाव्या लागतील.

खरी लढाई या 5 संघात– IPL 2024 Playoffs

आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठीचा खरा सामना फक्त पाच संघांमध्येच दिसत आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचा समावेश आहे. यामधील राजस्थानचे स्थान जवळपास पक्के मानलं जात आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या उर्वरित 5 सामन्यापैकी एक सामना जिंकला तरी त्यांचे 18 गुण होतील. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्सचे प्रत्येकी १२ गुण आहेत. या दोन्ही संघानी उर्वरित 5 सामन्यांपैकी कमीत कमी 3 सामने जिंकले तरी ते सुद्धा प्ले ऑफ साठी पात्र राहतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचे सध्या 9-9 सामन्यांत 10-10 गुण आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी याच दोन संघांमध्ये खरा संघर्ष असल्याचे मानले जात आहे.