हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या IPL 2024 कडे क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. आज याचं इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 17 व्या हंगामाचे वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर करण्यात आले आहे. थोड्या वेळापूर्वीच क्रिकेट नियामक मंडळाने याबाबतची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार, येत्या 22 मार्च पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.
यावर्षी लोकसभा निवडणुका आणि आयपीएल मॅचेस एकाच वेळी आल्यामुळे या वेळापत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज हे वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर झाल्यामुळे येत्या 22 मार्चलाच आज आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होईल हे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांमुळेच आयपीएलचे सामने देशाबाहेर खेळवण्यात आले होते. मात्र आता यावेळी हे सामने भारताचे होणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल दिली होती.
सध्या आयपीएलच्या पहिल्या 15 दिवसांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर (IPL 2024 Schedule) करण्यात आले आहे. कारण, मार्च ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका देखील होणार आहेत, त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संपूर्ण वेळापत्रक त्यानंतर जाहीर करणार आहे. बीसीसीआयने आता एकूण 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यातील पहिला सामना 22 मार्च रोजी रात्री 8 वाजता खेळवला जाईल. त्यानंतर दुपारचे सामने 3.30 वाजता आणि संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील. या कालावधीत चाहत्यांना एकूण चार डबल हेडर सामने पाहायला मिळतील.