हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच ईपला IPL 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल ला सुसुरुवात होण्यापूर्वीच यंदाची आयपीएल आम्हीच जिंकणार म्हणत सर्वच संघाचे चाहते वेगवेगळा दावा करत आहेत. त्यातच यंदाची महिला आयपीएल बंगळुरूच्या संघाने जिंकल्यानंतर आता विराट कोहली सुद्धा मेन्स आयपीएल जिंकवून देऊन चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार का? अशी चर्चा सुरु असतानाच ChatGPT ने मात्र आरसीबीच्या चाहत्यांचा हिरमोड केला आहे. कारण IPL 2024 कोणता संघ जिंकेल याबाबत अंदाज वर्तवला आहे.
मुंबई आणि चेन्नई प्रबळ दावेदार – IPL 2024
यंदाची आयपीएल स्पर्धा महेंद्रसिंघ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन्हीतील संघ जिंकेल असं ChatGPT ने म्हंटल आहे. ChatGPT ने सांगितले की CSK आणि MI हे दोन्ही संघ अतिशय संतुलित आहेत. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, दोन्ही विभागात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडे अनुभव आणि सातत्य पाहायला मिळते. त्यामुळेच यंदाच्या आयपीएल विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले आहेत. मात्र अखेर आयपीएल हा अनिश्चितेचा खेळ आहे त्यामुळे कधी कोण जिंकेल हे सांगता येत नाही असेही ChatGPT ने म्हंटल.
ChatGPT ने पुढे सांगितलं, धोनीच्या नेतृत्वाखालील, चेन्नईकडे अनुभवी खेळाडूंसह संतुलित संघ आहे. मोईन अली, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंमुळे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये चांगली डेप्थ पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशनसह मजबूत फलंदाजी आहे. तर गोलंदाजीच्या विभागात जसप्रीत बुमराहसारखा हुकमी एक्का आहे. त्यामुळेच हे दोन्ही संघ आयपीएल विजेते (IPL 2024) होऊ शकतात.




