हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 2023 (IPL Auction 2023) साठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. या लिलावात (IPL Auction 2023) काही खेळाडूंची मोठ्या प्रमाणात चांदी झाली आहे. या लिलावात आतापर्यंत सर्वाधिक रुपयांची बोली सॅम करनवर लावण्यात आली. त्याला 18.50 कोटी रुपये देऊन पंजाबने त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याची बेस प्राईस 2 कोटी होती. 18.50 कोटी हि आयपीएल इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक बोली ठरली आहे. चला एकदा नजर टाकूया कोणत्या खेळाडूवर किती लागली बोली.
1) मयांक मार्केंडेय (भारत) – 50 लाख रुपये, सनरायजर्स हैदराबाद (बेस प्राईस – 50 लाख)
2) आदिल रशीद (इंग्लंड) – 2 कोटी रुपये, सनरायजर्स हैदराबाद (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
3)ईशांत शर्मा (भारत) – 50 लाख रुपये, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राईस – 1.50 कोटी रुपये)
4) जॉईल रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) – 1.5 कोटी, मुंबई इंडियन्स (बेस प्राईस – 1.50 कोटी रुपये)
5) रिसे टॉप्ली (इंग्लंड) – 1.90 कोटी रुपये, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (बेस प्राईस – 1.90 कोटी रुपये)
6) जयदेव उनाडकट (भारत) – 50 लाख रुपये, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राईस – 50 लाख रुपये)
7) फिल सॉल्ट (इंग्लंड) – 2 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
8) हेनरिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका) – 5.25 कोटी रुपये, सनरायजर्स हैदराबाद (बेस प्राईस – 1 कोटी रुपये)
9) निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) – 16 कोटी रुपये, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
10) केन विलियमन्सन (न्यूझीलंड) – 2 कोटी रुपये, गुजरात टायटन्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
11) हॅरी ब्रूक (इंग्लंड) – 13.25 कोटी रुपये, सनरायजर्स हैदराबाद (बेस प्राईस 1.5 कोटी रुपये)
12) मयांक अग्रवाल (भारत) – 8.25 कोटी रुपये, सनरायजर्स हैदराबाद (बेस प्राईस – 1 कोटी रुपये)
13) अजिंक्य रहाणे (भारत) – 50 लाख रुपये, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राईस – 50 लाख रुपये)
14) सॅम करन (इंग्लंड) – 18.50 कोटी रुपये, पंजाब किंग्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
15) ओडियन स्मिथ (वेस्ट इंडिज) – 50 लाख रुपये, गुजरात टायटन्स (बेस प्राईस – 50 लाख रुपये)
16) सिकंदर रजा (झिम्बाब्वे) – 50 लाख रुपये, पंजाब किंग्स (बेस प्राईस – 50 लाख रुपये)
17) जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) – 5.75 कोटी रुपये, राजस्थान रॉयल्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
18) कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया) – 17.50 कोटी रुपये, मुंबई इंडियन्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
19) बेन स्टोक्स (इंग्लंड) – 16.25 कोटी रुपये, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राईस – 2 कोटी रुपये)
यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2023) परदेशी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. सॅम करन, हॅरी ब्रूक, निकोलस पूरन, हेनरिक क्लासेन, जेसन होल्डर, कॅमरून ग्रीन, बेन स्टोक्स या परदेशी खेळाडूंची मोठ्या प्रमाणात चांदी झाली आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या