हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 साठी बीसीसीआयची तयारी सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालून आयपीएल सामने सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. BCCIनं अजूनही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. दरम्यान बीसीसीआयनं यापूर्वी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची आयपीएल सामन्यांसाठी निवड केली होती. राज्य सरकारच्या परवानगीनंतर मुंबईबद्दल अंतिम निर्णय होईल, असेही त्यावेळी बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते.
यासाठी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी बुधवारी BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आयपीएल सामन्यांचे मुंबईत आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी ही भेट घेण्यात आली होती. त्या बैठकीत शरद पवारांनी आयपीएल प्रतिनिधींना महाराष्ट्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत मिळेल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, महाराष्ट्र व मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. अशात मुंबईत आयपीएल सामने होणार नसल्याची शक्यता कमी होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय व आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त cricbuzz ने दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’