Tuesday, January 7, 2025

IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव; दिल्लीचा संपुर्ण संघ क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 सुरळीतपणे पार पडत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल संघाचा खेळाडू मिशेल मार्शला कोरोनाची लागण झाली असून संपूर्ण संघ क्वारंटाईन झाला आहे. यापूर्वी दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढील सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळायचा आहे. मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. मिशेल मार्श सह सपोर्ट स्टाफ मधील आणखी एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे दिल्लीच्या संघाचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. आता आज आणि उद्या दिल्लीच्या खेळाडूंची कोरोना चाचणी होईल.

दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे देखील काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर फरहार्ट सध्या आयसोलेशनमध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान, दिल्ली कपिटल्स ने यंदाच्या आयपीएल मध्ये आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून त्यात त्यांना 2 विजय मिळवला आले आहेत तर 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.