IPL Retention Rule : BCCI चा मोठा निर्णय!! IPL 2025 साठी 5 खेळाडू रिटेन करता येणार; RTM चाही वापर होणार

IPL Retention Rule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 च्या हंगामापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी आपल्या ५ खेळाडूंना कायम (IPL Retention Rule) ठेवू शकते.तसेच तब्बल 6 वर्षांनंतर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची परवानगी सुद्धा संघाना मिळणार आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअर नियमही कायम राहणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणामुळे संघांना प्रमुख खेळाडू आपल्या ताफ्यात कायम करता येतील.

75 कोटी रुपये मोजावे लागणार- IPL Retention Rule

सहापैकी पाच खेळाडू हे कॅप्ड म्हणजे राष्ट्रीय संघासाठी खेळलेले असणं अनिवार्य आहे. तर केवळ दोनच खेळाडू अनकॅप्ड म्हणजेच राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले असू शकतात. एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागतील. तसेच जर संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या ५ खेळाडूंना रिटेन केल्यानंतर एक आरटीएम कार्ड सुद्धा फ्रेंचायजीना वापरता येणार आहे. म्हणजेच एकूण ६ खेळाडू रिटेन करता येऊ शकतात. (IPL Retention Rule)

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये मॅच फी मिळेल. हे त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. कोणत्याही परदेशी खेळाडूला मोठ्या लिलावासाठी नोंदणी करावी लागेल. परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नोंदणीसाठी अपात्र ठरेल.तसेच जर एखादा खेळाडू लिलावात निवडला गेला आणि नंतर त्याने खेळण्यास नकार दिला तर त्या खेळाडूला स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल आणि खेळाडूंच्या लिलावातही 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.

आणखी एक निर्णय म्हणजे एखादा कॅप्ड केलेला भारतीय खेळाडू अनकॅप्ड होईल जर खेळाडूने संबंधित हंगामाच्या आधीच्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी सामने, एकदिवसीय, T20I) सहभाग घेतला नसेल किंवा त्याच्याशी केंद्रीय करार नसेल. बीसीसीआय हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असेल. महेंद्रसिंग धोनी या नियमात बसत आहे.