BREAKING NEWS : IPL च्या सर्व सामान्यांना अखेर स्थगिती; BCCI चा मोठा निर्णय

ipl trophy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण संख्या ही वाढतच आहेत. संपूर्ण जगात कोरोना रुग्ण संख्या ही सर्वाधिक भारतामध्ये आहे. अशातच देशात आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच बीसीसीआयने यंदाचा आयपीएल सस्पेंड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सोमवारी कोलकाता नाईट राइडर्सचे तीन खेळाडू आणि चेन्नईचे दोन खेळाडू कोरोना बाधित सापडले होते. त्यानंतर सोमवारी संध्याकाळचा नियोजित सामना रद्द करण्यात आला होता. आता आयपीएलच सस्पेंड करण्याचा मोठा निर्णय बीसीसीआय कडून घेण्यात आला आहे. “आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल पुन्हा कधी रिशेड्युल करत येते याचा आम्ही विचार करत आहोत. आयपील सस्पेंड केली आहे, रद्द नाही” अशी माहिती शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

मागील काही दिवसांपासून आयपीएल मधील खेळाडूंना, तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती त्यावरूनच बीसीसीआयनं हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यातील सहभागी असलेले दोन खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. यात दिल्ली कॅपिटल टीमचे अमित मिश्रा आणि हैदराबाद टीमचे रिद्धिमान साहा यांचा समावेश आहे. सामना रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. खेळाडूंची कोरोना बाधित होण्याची प्रकरणे समोर येत असल्यामुळे आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.