IPL Time Table 2024 : जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL कडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे. नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला असून आता आयपीएल कधी सुरु होणार याचीच वाट क्रिकेट चाहते पाहत आहेत. यंदा भारतात लोकसभा निवडणूक असल्याने दरवेळी पेक्षा यावर्षीची IPL लवकर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या 29 मार्चला आयपीएलचे बिगुल वाजण्याची शक्यता असून या पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होऊ शकतो.
BCCI ने अजूनही आयपीएलचे अंतिम वेळापत्रक (IPL Time Table 2024) जाहीर केलेले नाही. नव्या वर्षात जानेवारी महिन्यातच याबाबत निर्णय BCCI जाहीर करू शकते. परंतु लोकसभा निवडणुका पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा लवकरच पार पडेल. २९ मार्चला आयपीएलचा पहिला सामना होईल तर अंतिम सामना ११ जूनला होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2024 साठी 19 डिसेंबर रोजी दुबईत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयपीएल लिलावात 333 खेळाडू सहभागी झाले होते, यातील 77 खेळाडूंना विविध संघानी खरेदी केलं.
74 साखळी सामने खेळवले जातील- IPL Time Table 2024
IPL 2024 मध्ये एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत. यंदाच्या आयपीएल मध्ये एकूण ७४ साखळी सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ एकूण १४ सामने खेळेल आणि गुणांच्या जोरावर सेमी फायनलसाठी कोण पात्र होईल हे ठरवलं जाईल. यातील पहिला आणि दुसरा संघ यांच्यात पात्रता सामना खेळला जाईल. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाईल आणि तिसरा आणि चौथा संघ यांच्यात एलिमिनेशन सामना खेळला जाईल, म्हणजे जो संघ हरेल तो बाहेर जाईल आणि तो संघ जिंकले त्याला अंतिम सामन्यात पोचण्यासाठी अजून एक संधी मिळेल.
कुठे पहाल IPL चे लाइव्ह स्ट्रीमिंग-
शक्यतो, IPL सामने Star Sports 1,2,3 आणि HD वर पाहिले जातात. तसेच मोबाईलच्या माध्यमातून Hotstar किंवा जीओ सिनेमावर पाहू शकता.
एकूण संघ – १०
एकूण क्रिकेट स्टेडियम – १०
आत्तापर्यतचा यशस्वी संघ – मुंबई इंडियन्स
यशस्वी कर्णधार – महेंद्रसिंघ धोनी
सर्वाधिक धावा – विराट कोहली
अधिकृत वेबसाईट – https://www.iplt20.com/