IRCTC Goa Package | सुट्ट्या साजरा करायच्या असतील तर अनेकजण गोव्याचे नाव घेतात. पाहायला गेलं तर गोवा हे आकाराने अतिशय छोटे आहे. मात्र अनेकजण तिथेच जाऊ इच्छितात. अनेकांचे तर गोव्याला जाणे हे स्वप्न असते. त्यातल्या त्यात तर हे नवीन वर्ष साजरे करायला गोव्याला जायचं म्हंटल तर अधिक चांगलं. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा यावर्षीचे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत गोव्यात साजरा करायचे असेल तर IRCTC ने तुमच्यासाठी एक मोठे टूर पॅकेज घेऊन आले आहे. हे पॅकेज कसे असेल याबाबत जाणून घेऊयात.
5 दिवसाचे असेल हे पॅकेज- IRCTC Goa Package
IRCTC आपल्या प्रवाश्यांना सुट्ट्यांचा आनंद देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याहीवेळी ख्रिसमच्या सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठे टूर पॅकेज आणले आहे. IRCTC ने प्रवाश्यांना गोव्याला घेऊन जाण्यासाठी एकूण 5 दिवस आणी 4 रात्रीचे टूर पॅकेज (IRCTC Goa Package) आणले आहे. गोव्याला जाण्यासाठी लखनऊ वरून फ्लाईट असणार आहे. तसेच गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण या दोन जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
केती येईल खर्च?
गोव्याला जाण्यासाठी IRCTC मार्फत फ्लाईट, हॉटेल आणि लोकल ट्रान्सपोर्ट असे मिळून प्रति व्यक्ती 51,000 हजार रुपये खर्च करावे लागतील. जर दोन व्यक्ती असतील तर 40,500 प्रत्येकी आणि तीन व्यक्ती असतील तर प्रत्येकी 38,150 रुपये द्यावे लागतील. सरकारी कर्मचारी आपल्या मुलांसोबत जाऊन यामध्ये LTC चा फायदा घेऊ शकतो. या टूरमुळे ज्यांनी गोवा पहिला नाही त्यांना गोव्याला जाण्याची संधी मिळणार आहे.
कोणत्या ठिकाणी देता येईल भेट?
गोव्यामधील सर्वाधिक पहिले जाणारे स्थळ म्हणजे तेथे असणारे बीच. हे बीच जरी आकाराने छोटे असले तरी येथील निसर्गरम्य वातावरण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडतो. त्यामुळे IRCTC च्या या पॅकेजद्वारे गोव्यामध्ये गेल्यानंतर तेथील दोन भाग म्हणजेच नॉर्थ आणि साऊथ येथील ठिकाणाला भेट दिली जाईल. यामध्ये साऊथ भागात मीरामार बीच, सायंकाल मांडवी नदीवरील क्रुजला भेट दिली जाईल तर नॉर्थ भागात गोव्यातील प्रसिद्ध असे बागा बीच, कंडोलिम बीच, स्नो पार्क, सिन्कवेर बीच, तसेच बेसिलिका ऑफ बोन जिसस चर्च इत्यादी ठिकाणे तुम्हाला या पॅकेज मध्ये पाहायला मिळतील. या पॅकेजबद्दल अधिक माहिती IRTC च्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. तसेच तुम्ही ज्या राज्यात राहता तेथून तुम्हाला फ्लाईट मिळू शकते. या टूर पॅकेजचा (IRCTC Goa Package) गोव्याच्या पर्यटनास चांगला फायदा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.