IRCTC : देशभरामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. IRCTC कडून ट्रेनचे ऑनलाईन बुकिंग करण्याची सुद्धा सुविधा असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ऑनलाईन बुकिंग सुविधेला प्राधान्य दिले जाते. मात्र एखाद्या वेळी आधी आपण रेल्वेचे बुकिंग करून ठेवतो. मात्र आयत्यावेळी आपल्याला बुकिंग रद्द करावे लागते. हे बुकिंग रद्द करीत असताना आपल्याला दंड भरावा लागतो. आता तिकीट रद्द करीत असताना ते तुम्ही कधी करीत आहात ? यावर सुद्धा दंडाची रक्कम अवलंबून असते. चला जाणून घेऊया तिकीट बुकिंग रद्द केल्यानंतर काय आहेत IRCTC चे नियम ?
48 तासांपूर्वी कन्फर्म केलेलं तिकीट रद्द केल्यास (IRCTC)
रेल्वेच्या नव्या नियमानुसार तुम्ही 48 तासांपूर्वी कन्फर्म केलेलं तिकीट रद्द केलं तर तुम्हाला (IRCTC) एसी फर्स्ट क्लास एक्झिक्यूटिव्ह क्लास साठी 240 रुपये, एसी २ टियर फर्स्ट क्लास साठी 200 रुपये, एसी 3 टीयर / एसी चेअर कार / एसी तीन इकॉनोमिक साठी 180 रुपये कॅन्सलेशन शुल्क भरावे लागेल. स्लीपर क्लास साठी तुम्हाला 120 रुपये मोजावे लागतील तर द्वितीय श्रेणीसाठी तुम्हाला 60 रुपये कॅन्सलेशन चार्जेस द्यावे लागतील.
48 तास ते बारा तासांपर्यंत किती शुल्क द्यावा लागेल?
ट्रेन सुटण्याच्या 48 ते 12 तासांच्या दरम्यान कन्फर्म केलेलं तिकीट रद्द (IRCTC) केलं तर तुम्हाला 25% कॅन्सलेशन फी भरावी लागेल. तसेच तुम्ही 12 तासांपेक्षा कमी वेळात तिकीट रद्द केलं तर अशा परिस्थितीत तुम्हाला 50% कॅन्सलेशन चार्जेस द्यावे लागतील. 48 ते 12 तासाच्या दरम्यान आणि बारा तासांपेक्षा कमी कालावधीसाठी प्रवाशांना अनुक्रमे 25% आणि 50 टक्के कॅन्सलेशन शुल्क भरावा लागेल.
आय IRCTC नुसार ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर तुमचं तिकीट रद्द करू शकत नाही. ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी चार्ट तयार केला जातो ही बाब लक्षात ठेवा. परंतु अशा वापरकर्त्यांनी ऑनलाइन टेडीआर भरावा ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी टीडीआर दाखल न केल्यास तुम्हाला कन्फर्म तिकिटावर परतावा मिळणार नाही. IRCTC च्या यात नवीन धोरणामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचा नियोजन अधिक काळजीपूर्वक करावा लागणार आहेत. IRCTC चे हे पाऊल अनावश्यक कॅन्सलेशन रोखण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक जबाबदार बनवण्याच्या उद्देशाने उचलण्यात आले आहे.