IRCTC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून लवकरच मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. अशावेळेला मुलांना घेऊन एका चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज आम्ही एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुमच्या मुलांना मजाही करता येईल शिवय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. रेल्वे विभागाकडून खास तूर पॅकेज आयोजित केले जातात. आंज आम्ही तुम्हाला अशा दोन ठिकाणांबद्दल (IRCTC)आणि त्याच्या तूर पॅकेज बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल
राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय (IRCTC)
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते आहे ‘राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय’ लहान मुलांना हे ठिकाण आवडेल यात शंका नाही. यासाठी तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. 11 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले हे ठिकाण भारतीय रेल्वेच्या (IRCTC) 166 वर्षांहून अधिक काळातील वैभवशाली वारसा इथे पाहायला मिळेल. मजा करण्यासोबतच मुलांना भारतीय रेल्वेचा इतिहासही समजेल. इथे तुम्हाला इलेक्ट्रिक इंजिन, कार, आर्मर्ड ट्रेन अशा अनेक गोष्टी पाहण्याची संधी मिळेल.
आता हे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोठे आहे ? तर ते नवी दिल्लीच्या (IRCTC) चाणक्यपुरी भागात आहे. तुम्ही खान मार्केट मेट्रो स्टेशनवरून येथे पोहोचू शकता. हे संग्रहालय मंगळूरपासून रविवारपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत खुले असते. तिकीट बुककरण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.
रामोजी फिल्म सिटी टूर पॅकेज (IRCTC)
या पॅकेजसाठी तुम्ही दर बुधवारी ट्रेन घेऊ शकता. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे, ज्यामध्ये (IRCTC) तुम्हाला रामोजी फिल्म सिटी तसेच हैदराबादच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी 9999 रुपये आहे. ट्रेनमध्ये तुम्हाला 3AC कोचमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 8799 रुपये वेगळे द्यावे लागतील.