IRCTC Tour Package : सध्या श्रावण सुरु झाला आहे आणि या महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक महादेवाची पूजा करत असतात. भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत, ज्यांचे धार्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही देखील या पावसाळ्यात कमी बजेटमध्ये या 12 ज्योतिर्लिंगापैकी सात ज्योतिर्लिंगांना जाण्याची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरणार आहे.
IRCTC ने सात ज्योतिर्लिंगांना जाण्यासाठी एक भन्नाट टूर पॅकेज आणला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही स्वस्तात सात ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकतात. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही भीमाशंकर, ग्रीनेश्वर, महाकालेश्वर, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर या 7 ज्योतिर्लिंगांना भेट भेऊ शकता. जाणून घेऊया या टूर पॅकेजची संपूर्ण माहिती सविस्तरपणे…
या टूर पॅकेजचे नाव काय आहे?
आयआरसीटीसीच्या (IRCTC Tour Package ) श्रावण स्पेशलच्या या टूर पॅकेजचे नाव आहे ‘हर हर महादेव! सात ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा (WZBGI07)’. तुम्ही ट्रेनमधून या टूर पॅकेजचा आनंद घेऊ शकता.
ज्योतिर्लिंग टूर पॅकेज कधी सुरू होत आहे?
हे टूर पॅकेज 13 ऑगस्ट 2023 पासून सुरू होत आहे. राजकोट येथून हा प्रवास सुरू होईल. सोयीनुसार आणि बजेटनुसार, स्लीपर, इकॉनॉमी, 3AC स्टँडर्ड, 3AC-कम्फर्टमध्ये तिकिटे बुक करता येतात.
टूर पॅकेज कालावधी किती आहे? (IRCTC Tour Package)
हे IRCTC टूर पॅकेज पूर्ण करण्यासाठी 9 रात्र आणि 10 दिवस लागतील. या दरम्यान मुक्काम, भोजन आणि मंदिरांना भेट देण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध असेल.
प्रवासाचा मार्ग –
ही गाडी राजकोट, साबरमती, छायापुरी, गोध्रा येथून प्रवासासाठी निघेल. येथून उज्जैनला पोहोचल्यानंतर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि महाकाल लोकांचे दर्शन घेता येईल. दुसऱ्या दिवशी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानंतर खांडवा रेल्वे स्थानकातून ओंकारेश्वर नाशिककडे रवाना होईल.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर प्रवाशांना पुणे येथे नेण्यात येणार आहे. तसेच जाताना भीमा शंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शन करून, रात्री गाडी औरंगाबादकडे रवाना होईल. यासोबतच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि वेरुळाच्या लेण्यांना भेट देण्याची संधी मिळेल.
पुढील प्रवासासाठी परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनाची सोय असेल. श्रीशैलमला पोहोचल्यानंतर मल्लिकार्जुनला येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. नंतर ट्रेन राजकोटला रवाना होईल.
ज्योतिर्लिंग प्रवास खर्च –
या प्रवासासाठी कम्फर्ट 2 एसी (सिंगल, डबल, ट्रिपल) तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती 42,163 रुपये आहे. इकॉनॉमी स्लीपरचे बुकिंग (सिंगल, डबल, ट्रिपल) 18,925 रुपये प्रति व्यक्ती असून मुलांसाठी भाडे 15893 रुपये आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही IRCTC वेबसाईटला भेट देऊ शकता.