हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अलिगढ मुस्लिम विद्यापीठात इतिहास विषयाचं अध्यापन करणाऱ्या इतिहासकार इरफान हबीब यांना अलिगढ न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल अलिगढ न्यायालयातील वकील संदीप कुमार गुप्ता यांनी हबीब यांना नोटीस पाठवली आहे.
या नोटीशीचं उत्तर ७ दिवसांत देण्याच्या सूचना हबीब यांना न्यायालयाकडून करण्यात आल्या आहेत. इरफान हबीब यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. अमित शहा यांनी आपल्या नावातील शहा काढावं कारण ते नाव पर्शियन आहे असा टोलाही हबीब यांनी लगावला होता. विनायक दामोदर सावरकर हे द्विराष्ट्र सिद्धांताचे पाईक असून त्यांच्यामुळेच देशाची फाळणी झाल्याचं इरफान हबीब आपल्या एका भाषणात म्हणाले होते.
याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय हा मुस्लिमांवर हल्ले करण्यासाठी झाला असल्याची खळबळजनक टिप्पणीही हबीब यांनी केली होती. याशिवाय स्वच्छ भारत योजनेतील गांधीजींचा चष्मा मोदी सरकारने काढायला हवा असा सल्लाही इरफान हबीब यांनी दिला होता. विषारी वक्तव्य करणाऱ्या हबीब यांनी इरफान हबीब यांनी माफी मागावी अशी मागणी या प्रकरणात केली आहे.