‘हर घर तिरंगा’ मोहिमेत इरफान पठाणने घेतला सहभाग; देशवासियांना केले ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारकडून स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. भारत सरकारने केलेल्या या आवाहनाला देशभरातील अनेक सेलिब्रेटींसह सामान्य नागरिक उस्फुर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत.

या मोहिमेत भारतीय संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाननेसुद्धा (Irfan Pathan) सहभाग नोंदवला होता. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठानने (Irfan Pathan) त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने तिरंग्यासमोर उभा राहून या मोहिमेत सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. तसेच त्याने त्याच्या घरी तिरंगा लावून या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. इरफान पठानने (Irfan Pathan) या व्हिडिओमध्ये “तिरंगा मेरी जान, तिरंगा मेरी शान, तिरंगा माझा अभिमान आहे. चला तर मग ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकवूया.” असे आवाहन केले आहे.

इरफान पठाणवर प्रेमाचा वर्षाव
इरफान पठाणच्या (Irfan Pathan) या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी इरफानचे कौतुक करत आहेत. इरफान पठाण (Irfan Pathan) स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. या संघाचे नेतृत्व भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे असणार आहे.

इंडियन महाराजा संघ –
सौरव गांगुली ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी.

रेस्ट ऑफ वर्ल्डचा संघ –
इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा, मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट ली, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!