Monday, February 6, 2023

समीर वानखेडेंना क्लीन चिट !; नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी समितीने काही निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांच्याबाबत महत्वाची माहिती दिली.

समीर वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते, वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असेही सिद्ध झाले नाही, परंतु हे सिद्ध झाले आहे की ते महार – 37 अनुसूचित जातीचे होते, असे वानखेडे प्रकरणी क्लीन चिट दिलेल्या समितीने अहवालात असे म्हंटले आहे.

- Advertisement -

समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांचे कागदपत्रे सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.