पुणे- बंगळूर महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर व्हॅगनार- आयशरचा अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बेंगलोर महामार्गावरती आज शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कराड जवळील कोल्हापूर नाका येथे व्हॅगनार गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात व्हॅगनार गाडीने आयशर ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत.  ‌

घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 13 आॅगस्ट रोजी सकाळी मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेला निघालेल्या व्हॅगनार (MH-04-HX-1220) चारचाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. मलकापूर हद्दीत झालेल्या अपघातात व्हॅगनार कारने आयशर टेम्पोला (MH- 42-B-8104) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात चालक मथुकेश संजय कुमो (वय-40, रा. मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संजय रायाप्पा कुमो (वय-44), रचि वलीगवडा (वय -42), नरेश बुकोमा (वय-42, रा. सर्व रा‌ मुंबई) किरकोळ जखमी झाले आहेत. ‌‌

अपघातातील जखमींना कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आयशर चालकाचे शांताराम तुकाराम कारंडे (वय- 50) असे नाव आहे. घटनास्थळी तात्काळ हायवे हेल्पलाइन इन्चार्ज दस्तगीर आगा, राजू ओव्हाळ, प्रकाश गायकवाड व विशाल ओव्हाळ यांच्यासह महामार्ग पोलीस स्टेशनचे जावेद भाई कराडकर, खलीद इनामदार व कराड शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते.