हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर नव्यानेच Credit Card वापरण्यास सुरुवात केली असेल, तर ‘मिनिमम ड्यू’ म्हणजे हे कळालेच असेल. ही किमान थकबाकी रक्कम असते, जी न भरल्यास आपल्याकडून व्याजासहीत दंड आकारला जातो. हे लक्षात घ्या आपल्या कडून खर्च केल्या गेलेल्या एकूण रकमेच्या 4-5 टक्के मिनिमम ड्यू रक्कम द्यावी लागते. मात्र बर्याच लोकांना असे वाटते की, मिनिमम ड्यू भरून ते इतर कोणतेही शुल्क भरण्यापासून वाचतात, परंतु प्रत्यक्षात तसे नाही.
मिनिमम ड्यू द्वारे आपलो दंड भरण्यापासून बचत होईल हे खरे असले तरीही थकीत रकमेवरील व्याज दिवसेंदिवस वाढतच जाईल. तसेच जर आपण सतत फक्त मिनिमम ड्यू रक्कम भरत असाल तर एकाच वेळी व्याजाची रक्कम मिनिमम ड्यूच्या रकमेपेक्षा जास्त होईल. त्याच वेळी जर सतत असे करत असाल तर बँकेकडून 5% ऐवजी 10% मिनिमम ड्यू आकारला जाऊ शकतो, कारण मिनिमम ड्यू हा आपल्या मूळ कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतो. Credit Card
अशा प्रकारे होईल नुकसान
हे लक्षात घ्या कि, मिनिमम ड्यूची रक्कम न भरल्याने आपण कर्जाच्या जाळ्यातही अडकू शकाल. ही रक्कम व्याज भरण्यासाठी वापरली जाते आणि मूळ रक्कम मात्र तशीच राहते हे लक्षात असू द्यात. Credit Card च्या बिलावर एकावेळी 50 टक्के व्याज द्यावे लागेल. याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम होतो, काहीवेळा तो गुन्ह्याच्या श्रेणीतही टाकला जातो. खराब क्रेडिट स्कोअरमुळे पुढच्या वेळी कर्ज घेणे अवघड होते.
वेळेवर बिल भरा
तज्ञ सांगतात की, Credit Card चा वापर फक्त तेव्हाच करावा जेव्हा आपल्याला खात्री असेल की आपण ते ड्यू डेट आधीच पैशांची परतफेड करू शकाल. म्हणूनच क्रेडिट कार्ड काळजीपूर्वक वापर करा आणि वेळेवर पैसे द्या. जर असे करू शकत नसाल तरच मिनिमम ड्यूची सुविधा वापरा. मात्र, इथे हे लक्षात ठेवा की, याची सवय होऊ देऊ नका.
ड्यू डेट म्हणजे काय ???
Credit Card च्या पेमेंटसाठी एक बिलिंग सायकल असते. यामध्ये आपली क्रेडिट सायकल महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला रिन्यू केली जाते. यानुसार आपली ड्यू डेट ही सुमारे 15 दिवसांनी असते. उदाहरणार्थ, समजा की सायकल रिन्यूअलची तारीख म्हणून महिन्याची 30 तारीख निश्चित केली असेल तर आता याच्या 15 दिवसांनी म्हणजे 14 किंवा 15 तारखेला ड्यू डेट असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरांनी पकडला वेग, आजचे नवीन दर तपासा
Stock Tips : बाजारातील तेजीच्या दरम्यान ‘हे’ 5 स्टॉक्स अल्पावधीत देऊ शकतात मोठा नफा
EPFO पोर्टलवर घरबसल्या अशा प्रकारे तपासा आपल्या पेन्शनचे स्टेट्स
‘या’ बँका Personal Loan वर देत आहेत आकर्षक व्याजदर
PIB Factcheck : केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना देणार 80,000 रुपये, जाणून घ्या या मेसेजमागील सत्यता