हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग ही राज्यात आहे. हा वर्ग फक्त दलित आहे असं नाही तर बारा बलुते दार आणि अठरा पगड जातीत तो पसरला आहे. आता तर त्यांनी थेट मराठा मोर्चात सहभागी होऊन सर्वांना धक्का दिला आहे. तसंच आता नव्या राजकीय आघाडीची तर ते तयारी करत नाहीत ना? अशी चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली होती त्यानंतर दोघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हापासून मात्र वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीमहाराज दोन्हीही वारसदार एका नव्या राजकीय आघाडीला जन्म देणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वंचित आघाडी हा मोठा फॅक्टर
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि महाराष्ट्र विधानसभेला ही वंचित हा मोठा फॅक्टर होता तो किती जागा जिंकू यापेक्षा कोणाचे किती उमेदवार पाडतो याची चर्चा जास्त होती. वंचित ची राजकीय ताकद आहे पण ती निवडून येण्यास कमी पडते आता प्रकाश आंबेडकर मराठा मोर्चात सहभागी झाले त्यामुळे वंचितचा बेस वाढण्यात मदत होऊ शकते.
नव्या आघाडीची मुहूर्तमेढ
शिवशक्ती आणि भीमशक्ती हे महाराष्ट्राला परिचित असलेले शब्द आहेत पण शिवसेना आणि रामदास आठवले यांच्या एकत्र येणे यावर हे शब्द जास्त वापरले जातात. मात्र आता हे दोन शब्द वापरले जातात पण त्याचे संदर्भ मात्र वेगळे आहेत. शिवशक्ती म्हणजे संभाजी राजे छत्रपती मराठा शक्ती आणि भिम शक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची भिम शक्ती विशेष म्हणजे दोघेही जण महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचे वंशज आहेत त्या दोघांनी म्हणजे छत्रपती संभाजी आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र आघाडीचे तयारी करावी अशी मागणीही होत आहे तशी चर्चा देखील आहे आत्ताचा जो मूक मोर्चा आहे त्यात आंबेडकर यांचा सहभाग नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवू शकतो.
आगामी निवडणुकांवर परिणाम
आगामी निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असेल तर मराठा आरक्षण प्रकाश आंबेडकर यांनी त्याच्या लढ्यात सहभाग घेतला त्याचा थेट परिणाम निवडणुकांच्या गणितांवर दिसून येईल. सध्याच्या राजकारणात मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. अशा स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांना गरीब मराठा श्रीमंत मराठा अशी मांडणी करत ठोस भूमिका घेतलेली आहे गरीब मराठ्यांना आरक्षण द्या तशी धाडसी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिमा उंचावण्याचे दिसत आहे.
वंचित भाजपची बी टीम
प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याची टीका वारंवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून केली जात आहे. छत्रपती संभाजी महाराज हे भाजपा कडूनच राज्यसभेवर आहेत त्यांच्या मूक मोर्चात भाजपच्याच मंडळींचा वावर जास्त आहे. आंबेडकर ही त्या मोर्चात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर भाजपची बी टीम म्हणून आता ही टीका होऊ शकते.