भारतात Tiktok चं Comeback होणार? या नावाने कंपनी करणार रिएन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी भारतात अनेक चिनी अ‍ॅप्स बॅन करण्यात आले. त्यापैकी अतिशय लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅपवरही भारत सरकारकडून बंदी आणण्यात आली होती. बॅननंतर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरुनही हटवण्यात आले आणि भारतीय नेटवर्कवर हे अनअ‍ॅक्सेसिबल झालं. भारतात टिकटॉकचे अनेक चाहते आहेत. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता टिकटॉक फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

टिकटॉक लवकरच भारतात पुन्हा एन्ट्री करू शकतं, अशी माहिती मिळत आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सने पेटेंट, डिझाईन आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरलसह शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅपसाठी एक ट्रेडमार्क दाखल केला आहे. बाइटडान्सने 6 जुलै रोजी टिकटॉकसाठी TickTock या नव्या टायटलसह ट्रेडमार्क दाखल केला आहे. ट्विटरवर टिपस्टर मुकुल शर्मा यांच्याद्वारे हे रिपोर्ट करण्यात आले.

टिकटॉक देशात पुन्हा आणण्यासाठी बाइटडान्स सरकारशी चर्चा करत आहे. भारतातील नव्या आयटी नियमांचं पालन करण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासनही चिनी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना दिलं आहे. भारत आणि चीनमधील तणावादरम्याम मागील वर्षी सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाइटडान्सची मालकी असलेलं टिकटॉक अ‍ॅप भारतात बॅन करण्यात आले होते. हे अ‍ॅप ज्यावेळी बॅन केले तेव्हा देशात टिकटॉकचे जवळपास 20 कोटी युजर्स होते.

Leave a Comment