तुमच्या आधारचा कुठे गैरवापर होत आहे का? Aadhar Authentication History कशी तपासावी जाणून घ्या

0
109
Aadhaar Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या काळात आधार कार्डचा वापर जवळपास सर्वत्र केला जातो आहे. आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स बनले आहे. हा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. सर्व सरकारी योजना, अनुदान इत्यादींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, काही फसवणुकीमुळे तुमचे आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

UIDAI देते खास सुविधा
वास्तविक, आधार नंबर जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही सुविधा पुरवते जेणेकरून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तपासता येईल.

आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री कशी तपासावी ?
>> सर्व प्रथम, तुम्ही आधार नंबर जारी करणारी संस्था UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in वर जा.
>> यानंतर Aadhar Authentication History वर क्लिक करा.
>> आता तुमचा आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाका.
>> त्यानंतर ‘Generate OTP’ वर क्लिक करा
>> OTP टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि ट्रान्सझॅक्शनची संख्या नमूद करावी लागेल.
>> आता निवडलेल्या कालावधीसाठी ऑथेंटिकेशन रिक्वेटचे डिटेल्स स्क्रीनवर दिसून येतील.

आधार कार्डचा गैरवापर झाल्यास अशा प्रकारे करा तक्रार
तुम्हाला तुमच्या आधारच्या वापरात काही गैरवापर झाल्याची शंका असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास, तुम्ही ताबडतोब UIDAI टोल फ्री क्रमांक – 1947 वर किंवा help@uidai.gov.in येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here