आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट? घरबसल्या ‘अशा’ प्रकारे करा चेक

Aadhar Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजच्या काळात आधार कार्ड हे एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हे ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा म्हणून उपयुक्त आहे, तसेच कोणत्याही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. आधार हा एक युनिक आयडेंटिटी नंबर आहे, जो जानेवारी 2009 मध्ये लाँच करण्यात आला होता. आधारसाठीचा डेटा UIDAI द्वारे गोळा केला जातो, जो भारत सरकारने स्थापन केलेला वैधानिक प्राधिकरण आहे. UIDAI केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अखत्यारीत येते.

सरकारी योजनांतर्गत लाभार्थ्यांना आधार कार्डचा सर्वाधिक लाभ मिळत आहे. आधार कार्डच्या मदतीने रेशनकार्ड युझर्सना लाभ मिळत असून पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जात आहेत. आधार कार्डद्वारे तुम्ही अनेक फायदेही घेऊ शकता.

आधारची उपयुक्तता जसजशी वाढत आहे, तसतशी आधारशी संबंधित फसवणूकही वाढत आहे. देशात आधारशी संबंधित फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर UIDAI इशारा दिला होता कि सर्व 12-अंकी क्रमांक आधार नंबर नसतात.

बनावट आणि खरे आधार कार्ड

बनावट आधारकार्डची वाढती प्रकरणे पाहता आपले आधार कार्डही खरे की बनावट अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड खरे आहे की नाही हे शोधणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. आधार कार्डची सत्यता आता घरबसल्या सहज तपासता येते.

आधार कार्डची सत्यता कशी तपासायची-
सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत पोर्टल http://uidai.gov.in ला भेट द्या.
येथे ‘My Aadhaar’ वर क्लिक करा.
My Aadhaar वर क्लिक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व सर्व्हिसेसची लिस्ट तुमच्यासमोर उघडेल.
या लिस्ट मध्ये, Verify an Aadhaar number वर क्लिक करा.
त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोडचे व्हेरिफिकेशन करा.
आता Proceed to Verify वर क्लिक करा.
तुम्ही एंटर केलेला मोबाइल क्रमांक व्हॅलिड असल्यास, त्यावर एक नवीन पेज पाठवला जाईल.
या मेसेजमध्ये आधार कार्ड क्रमांकासह वय, लिंग आणि राज्य अशी माहिती असेल.
ते आधी जारी झाले होते का ते इथे कळेल.
जर हे कार्ड कधीच दिले गेले नसेल, तर ज्या कार्डचे व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे ते कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट होते.