5 राज्यांतील निवडणूकीच्या तारखा जाहीर; पहा कधी होणार निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील ५ राज्याच्या निवडणुकीबाबत घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब , मणिपूर , गोवा आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे . उत्तर प्रदेश आणि मणिपूर निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून पंजाब, उत्तरखंड आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्यात येईल असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केलं

उत्तरप्रदेश 10 फेब्रुवारी पासून निवडणुकीचा पाहिला टप्पा, 14 फेब्रुवारी पासून दुसरा टप्पा… तर 20 फेब्रुवारी ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल….. 23 फेब्रुवारी,27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च असे 7 टप्प्यात उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक होतील. पंजाब उत्तरखंड आणि गोवा इथे 14 फेब्रुवारी ला मतदान होईल. मणिपूर ला 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च असे 2 टप्प्यात मतदान होईल. 10 मार्चला पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार

५ राज्यांमध्ये ६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड येथील खर्चाची मर्यादा ४० लाख असेल तर गोवा आणि मणिपूर येथील खर्चाची मर्यादा २८ लाख असेल

कोरोनामुळे उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरतील. मतदार केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात येईल. २ डोस झालेले कर्मचारीच मतदान केंद्रावर असतील तसेच कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येईल अशी माहिती सुशील चंद्रा यांनी दिली तसेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड19 रुग्ण पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात असे सीईसी सुशील चंद्रा यांनी सांगितले