इस्लाम धर्म हाच हिंदुस्थानचा खरा शत्रू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. इस्लाम धर्म हाच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना संभाजी भिडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील शिरुर  तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. याच वेळी संभाजी भिडे यांनी त्यांच्या भाषणात हे विधान केले.

संभाजी भिडे म्हणाले, औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीय. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदीूस्थान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं भिडे म्हणाले.

आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्त्वात नाहीत. पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रुपाने औरंगजेब अजूनही अस्तित्त्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहे. संभाजी महाराजांनी मरेपर्यंत इस्लाम धर्म पत्कारला नाही. त्यांच्यात ती आग आणि धमक होती. त्यामुळे आता हिंदू समाजानेही तितक्याच पोटतिडकीने इस्लामला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment