नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची खाती काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता बिन बिनखात्याचे मंत्री झाले आहेत.

नवाब मलिक यांच्या कडे असलेल्या कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रीपद देण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्याकडील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर मलिक यांच्याकडे असलेल्या गोंदिया आणि परभणीच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार काढण्यात आला आहे. त्यात परभणीचे पालकमंत्रीपद सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे, तर गोंदियाचे पालकमंत्रीपद ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाचे राज्यातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment