Islampur Name Change : सांगलीतील इस्लामपूर शहराचे नाव बदलणार!! भुजबळांची मोठी घोषणा

Islampur Name Change
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Islampur Name Change । मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. सर्वात आधी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, त्यानंतर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असं झालं, नंतर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं. आता सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर असलेल्या इस्लामपूरचे नाव बदलण्याची तयारी सरकार कडून सुरु आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. त्यानुसार, इस्लामपूरचे नामकरण आता ईश्वरपूर असं होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

अनेक दिवसांपासून मागणी- Islampur Name Change

मागील काही दिवसांपासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी सुरू होती. यापूर्वी हिंदू संघटनेने शिवप्रतिष्ठानने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. यावर आज विधानसभेत चर्चा झाली, या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या वतीने ही मागणी मान्य केली . इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच हा प्रस्ताव पूर्णपणे स्वीकारला जाईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. काही दिवसात यासंदर्भातील शासनस्तरावरील कार्यवाही पूर्ण झाली की शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल. त्यानंतर मग ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ असं सर्वच ठिकाणी इस्लामपूर ऐवजी ईश्वरपूर असं नामकरण होईल. Islampur Name Change

यापूर्वी महाराष्ट्र सरकारने दोन शहरांची नावे बदलली होती. यातील औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केलं तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव ठेवलं.. आता छत्रपती संभाजीनगर शहरात ज्याठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबादचे नाव सुद्धा बदलण्याची मागणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली आहे. आपल्या भारतावर ज्या ज्या आक्रमकांनी राज्य केलं आहे, मग तो आदिलशाह असो, निजामशाह असो वा इतर मुघल किंवा इंग्रज असो, या सर्वांचा इतिहास जागविण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. परंतु हा इतिहास मिटविण्याचे काम आम्ही करू. वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे आहे, मात्र याठिकाणी शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लपवण्यात आला आहे. आणि आक्रमण ज्यांनी केलं त्यांचा इतिहास जागवण्यात आलं आहे. जेव्हा मी खुलताबादला जातो आणि तिथे औरंगजेबाचे नाव पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. त्यामुळेच खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर असे करण्याची मागणी केणेकर यांनी केली.