हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 जानेवारी रोजी इस्रोने XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यानंतर नूतन वर्षांमध्ये इस्रो कमीतकमी १२ मोहिमा पूर्ण करेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, “2024 हे वर्ष गगनयान तयारीसाठी असणार आहे. संपूर्ण वर्षच ‘गगनयान वर्ष’ असणार आहे.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, “2024 हे वर्ष गगनयान तयारीसाठी असणार आहे. संपूर्ण वर्षच ‘गगनयान वर्ष’ असणार आहे. त्यासोबतच पॅराशूट सिस्टीम सिद्ध करण्यासाठी यंदाच्या वर्षात हेलिकॉप्टर-आधारित ड्रॉप टेस्ट देखील करण्यात येणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॉप टेस्ट करण्यात येणार आहेत”
तसेच, “नववर्ष २०२४ मधील १२ महिन्यात कमीतकमी १२ मोहिमांचे आमचे लक्ष्य आहे. हे आमच्या हार्डवर्क आणि क्षमतेवर अवलंबून आहे. जर सर्व चाचण्या आणि गोष्टी व्यवस्थित झाल्या, तर आणखी चांगले परिणाम दिसतील. नाहीतर आम्ही किमान १२ ते १४ नवीन अंतराळ मोहिमांसाठी तयार आहोत” अशी मोठी माहिती सोमनाथ यांनी दिली आहे.
दरम्यान, “नवे वर्ष अवकाश संशोधनासाठी महत्त्वाचे वर्ष अरणार आहेत. या वर्षात शेकडो मूल्यांकन चाचण्या आखण्यात आल्या आहेत. त्यासोबतच GSLV चे देखील प्रक्षेपण करण्यात येणार आहे.” असे देखील डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या 2024 वर्षात इस्रो कोणकोणत्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.