हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रामसेतू हा शतकानुशतकापासून प्रचलित आहे. आता या रामसेतूबाबत एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थांनी ॲडम्स ब्रिजच्या बुडलेल्या संरचनेचे मॅप तयार केलेले आहे. हा ॲडम्स ब्रिज म्हणजेच रामसेतू आहे. हा पूल भारतश्रीलंका यांना जोडला जातो. हा प्राचीन पूल भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील खूप प्रचलित आहे.
संशोधकांनी नकाशा तयार केला
संशोधकांनी ऑक्टोबर 2018 ते 2023 या कालावधीत बुडलेल्या संपूर्ण लांबीचा दहा मीटर रिझर्वेशनचा नकाशा तयार केलेला आहे. त्यानंतर त्याचे तपशील देखील केलेले आहे. तपशिलावर पाण्याखालील नकाशावर वरून धनुष्य कोडी ते तलाई मन्यारपर्यंत पूल दिसत आहे. त्यातील तब्बल 99.98% भाग हा उथळ पाण्यात बुडालेला आहे. इस्रोमधील शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या उपग्रहातून लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून हा नकाशा तयार केलेला आहे.
या ब्रिजच्या बुडालेला संरचनाला ईस्ट इंडिया कंपनीने ॲडम्स ब्रीज असे नाव दिलेले आहे. हा रामसेतू म्हणून भारतीयांनी वर्णन केलेल्या रचनेचा उल्लेख रामायणात केलेला आहे. रामाच्या सैन्याने रावणाच्या राज्यात म्हणजे श्रीलंकेत सीतेला वाचवायला जाण्यासाठी हा पूल बांधला गेल्याचे म्हटले जात आहे.
इसवी सनाच्या नवव्या शतकातील या पुलाला सेतू बांधाई किंवा समुद्रावरील पूल असे म्हटले जात होते. रामेश्वर मधील मंदिराच्या नोंदीनुसार 1480 पर्यंत हा पूल समुद्रसपाटीपासून उंच होता.