सातारा| येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित कोईम्बतुर येथील नेहरू आर्टस् अँड सायन्स महाविद्यालयाबरोबर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना नेहरू महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासात अश्या प्रकारचा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम प्रथमच होत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना खरा भारत समजण्यास मदत होईल आणि ते भारतीय म्हणून जगातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. १८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वाय.सी. महाविद्यालयाचे २१ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या पाच दिवसात महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी, तमिळ खेळ, तमिळ अन्न संस्कृती, मंदिर भेट, आऊट बोउंड ट्रेनिंग , उटी येथील बोटॅनिकल गार्डन, आदिवासी खेड यांना भेटी तसेच तमिळ व महाराष्ट्रातील लोक कलांच्या सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान वाय. सी. व नेहरू कॉलेज दरम्यान सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या ज्यातुन भविष्यात असे अनेक कार्यक्रम विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित करण्यात येतील. अशी माहिती प्राचार्य डॉ बी.टी. जाधव यांनी दिली.
डॉ मनीषा पाटील व प्रा. बी. एस. पवार यांनी एकवीस विद्यार्थ्यांच्या सोबत या सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.राज्याबाहेर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम राबवणारे वाय.सी. पहिलेच महाविद्यालय असून यातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्म भाव रुजवला जाईल याबद्दल डॉ बी.टी. जाधव यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.