नवी दिल्ली । जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील पत्ता अपडेट करायचा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UIDAI ने आधार मध्ये एड्रेस अपडेट करण्यासाठीचे नियम बदलले आहेत. आता तुम्ही एड्रेस प्रूफशिवाय आधारमध्ये एड्रेस (Aadhaar Card Address Change Process) अपडेट करू शकत नाही. पूर्वी UIDAI ने हे नियम शिथिल केले गेले होते, पण आता हे नियम पुन्हा बदलण्यात आले आहेत. UIDAI ने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
UIDAI ने ट्वीटमध्ये लिहिले आहे की,” नियम बदलल्यानंतर, आधार कार्डवरील एड्रेस बदलण्याआधी तुम्हाला कागदपत्रांची लिस्ट चेक करावी लागेल आणि फक्त या कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही आधारमध्ये पत्ता अपडेट करू शकता. आधार कार्डवर तुम्ही तुमचा पत्ता कसा बदलू शकता ते जाणून घ्या –
ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
>> UIDAI च्या वेबसाइटवर जा आणि ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.
>> यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. नंतर सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड एंटर करा.
>> त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ या पर्यायावर क्लिक करा.
>> तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल, जो एंटर करायचा आहे.
>> नंतर ‘लॉगिन’ वर क्लिक करा.
>> तुम्ही लॉग इन करताच तुमचे आधार डिटेल्स स्क्रीनवर दिसू लागतील.
>> यामध्ये तुमचा एड्रेस बदला आणि दिलेल्या 32 कागदपत्रांपैकी कोणत्याही एकाची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि सबमिट करा.
ऑफलाइन अर्ज कसा करावा ?
>> तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन आधार कार्ड अपडेट फॉर्म भरा.
>> फॉर्म सबमिट करा आणि व्हेरीफिकेशनसाठी तुमचे बायोमेट्रिक्स द्या.
>> कर्मचारी तुम्हाला पावती देईल, ज्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल.
>> या URN चा वापर करून आधार अपडेशन स्टेट्सचा ट्रॅक केला जाऊ शकतो.