पुणे | राज्यात पाच ते सहा दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
मागील 24 तासात राज्यात महाबळेश्वर येथे 19.4 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 41.9 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
सध्या बिहार आणि झारखंड परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच कोमोरीन परिसर आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र कर्नाटक व केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालचा उपसागर श्रीलंका, दक्षिण तमिळनाडूची किनारपट्टी या भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पचा पुरवठा होत आहे. परिणामी पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जना वादळी वारा वीज यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
तर राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर,गडचिरोली, यवतमाळ याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा