नवी दिल्ली । इटलीने एक मोठा निर्णय घेऊन कोरोनाविरोधी लस कोविशिल्डला मंजुरी दिली आहे. इटलीतील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. इटलीच्या या हालचालीनंतर, कार्डधारक (Covishield Card Holders) नागरिक आता युरोपियन देशांमध्ये प्रवासासाठीच्या ग्रीन पाससाठी पात्र होतील. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांचे इटालियन समकक्ष रॉबर्टो स्पेरान्झा यांच्यात झालेल्या बैठकीच्या परिणामी इटलीने भारताच्या कोविडशील्ड लसीला मान्यता दिली आहे.
परराष्ट्र मंत्री आपल्या समकक्षांशी बोलले
यापूर्वी बुधवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इटलीचे परराष्ट्र मंत्री लुईगी डी मायो यांच्याशी देखील चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये लसीचा प्रवेश आणि सुरळीत प्रवासाशी संबंधित आव्हानांवर चर्चा झाली. उल्लेखनीय म्हणजे, इटालियन परराष्ट्र मंत्री लुईगी डि मायो हे सध्या G20 चे अध्यक्ष देखील आहेत.
इटलीपूर्वी ब्रिटननेही भारताच्या कोविशील्डला मान्यता दिली होती. बुधवारी ब्रिटनने येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविशील्डला मान्यता दिली. मात्र, भारतातून यूकेमध्ये येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे.
ब्रिटनने वेगवेगळ्या देशांची तयार केली लिस्ट
यावेळी, कोरोना संकटामुळे ब्रिटनने वेगवेगळ्या देशांसाठी तीन प्रकारच्या लिस्ट केल्या आहेत. या लिस्ट रेड ,ग्रीन आणि यल्लो आहेत. ऑक्टोबरमध्ये सर्व लिस्ट विलीन केल्या जातील आणि फक्त रेड लिस्टच राहील. रेड लिस्ट मध्ये समाविष्ट केलेल्या देशांच्या नागरिकांसाठी ब्रिटनच्या प्रवासावरील निर्बंध लागू राहतील.