हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत रवानगी करण्यात आली आहे.
नोएडातल्या तीन मुलांसह सहा जणांचे नमुनेदेखील चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं चाचणी अहवालातून समोर आलं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सहा जणांना पुढील १४ दिवस त्यांच्या घरात कुटुंबीयांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्यांच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कालपर्यंत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या ६ होती. त्यात आता इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांची भर पडल्यानं हा आकडा २१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातले तीन जण केरळचे होते. या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.