हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITC Share : जागतिक बाजारातील चढ उतारामुळे भारतीय शेअर बाजारात दीर्घकाळापासून प्रचंड अस्थिरता आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खालच्या पातळीवर घसरले आहेत. मात्र ITC च्या शेअर्स यावेळी गती पकडली आहे. आयटीसीचे शेअर्स गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत. आज (सोमवारी) तर ते आपल्या गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे.
आज सोमवारी ITC चे शेअर्स 2.50 टक्क्यांहून जास्तीच्या वाढीने 290 रुपयांवर ट्रेड करत आहेत. 2019 नंतरची ITC ची ही सर्वोच्च पातळी आहे. गेल्या काही वर्षांत खराब कामगिरी केल्यानंतर आयटीसी आता फॉर्ममध्ये आला आहे. एकीकडे सेन्सेक्स 11 टक्क्यांनी घसरला असताना या शेअर्समध्ये 32 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली आहे. ITC Share
ITC विषयी बोलायचे झाल्यास या कंपनीचा व्यवसाय FMCG, हॉटेल्स, पॅकेजिंग, पेपरबोर्ड, स्पेशॅलिटी पेपर आणि कृषी व्यवसाय यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये पसरला आहे. FMCG प्रमुख कंपनीने जानेवारी-मार्चच्या कालावधीत निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवली आहे. एका वर्षापूर्वी तो 3,755 कोटी रुपये होता. कोलकाता-बेस्ड असलेल्या या कंपनीचा महसूल 15% वाढून 17,754 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षाच्या कालावधीत तो 15,404 कोटी रुपये होता. ITC Share
त्याचा FMCG महसूल 12.3% वाढून ₹4,141.9 कोटी झाला, तर सिगारेटचा महसूल 10% वाढून ₹6,443 झाला. हॉटेल व्यवसायाने या तिमाहीत ₹389.6 कोटी कमाई नोंदवली, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 35.3% वाढली आहे. ITC Share
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.itcportal.com/
हे पण वाचा :
EPFO : नोकरी बदलल्यानंतर अशा प्रकारे नवीन खात्यात PF चे पैसे कसे ट्रान्सफर करा
Business Idea : अत्यंत कमी खर्चात ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा भरपूर पैसे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवीन दर पहा
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ??? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
UPI द्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी ??? अशा प्रकारे समजून घ्या