itel P55 Series : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Itel नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असे मोबाईल आणत असते. कमी किमतीत स्मार्टफोन मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणावर Itel च्या मोबाईलला पसंती दर्शवतात. ग्राहकांचा हाच विश्वास खरा उतरवत Itel ने नुकतंच मार्केट मध्ये itel P55 Series लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने itel P55 आणि itel P55+ असे २ मोबाईल बाजारात आणले आहेत. आज आपण या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमती जाणून घेऊयात…..
itel P55 : itel P55 Series
itel P55 मध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचचा HD+ डिस्प्ले दिला आहे. मोबाईल मध्ये Unisoc T606 Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जला सपोर्ट करते. स्मार्टफोन मध्ये 4GB+8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB+16GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएन्ट पर्याय उपलब्ध आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास itel P55 मध्ये 50 मेगापिक्सल + AI क्लिअर ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे तर समोरील बाजूला 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या मोबाईलच्या 4GB+8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7499 रुपये आहे तर 8GB+16GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 8999 रुपये ठेवण्यात आली आहे .
itel P55+
itel P55+ मध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंचचा HD+ डिस्प्ले दिला आहे. मोबाईल मध्ये -Unisoc T606 Octa Core प्रोसेसर दिला असून 16GB आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्यामुळे गेमिंग साठी सुद्धा हा मोबाईल उपयुक्त ठरतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, itel P55+ मध्ये 50MP + AI क्लियर ड्युअल कॅमेरा मिळतो. तर समोरील बाजूला 8MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 45W टाइप C चार्जिंगला सपोर्ट करते. itel P55+ एकाच व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आला असून त्याची किंमत 9999 रुपये इतकी आहे. itel P55 Series ची पहिली विक्री 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता थेट केली जाईल.