Karan Wahi : प्रसिद्ध अभिनेत्याला अज्ञात व्यक्तीकडून विचित्र वागणूक; घ्यावी लागली मुंबई पोलिसांची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Karan Wahi) हिंदी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय चेहरा असलेल्या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे. या अभिनेत्याचे नाव करण वाही असून त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. करणचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत मुंबईच्या रस्त्यावर एक विचित्र घटना घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने बाईकवरून आपला पाठलाग केला आणि शिवीगाळ केल्याचे अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण वाहीसोबत हा प्रकार सोमवारी रात्री घडला. याबाबत त्याने स्वतःच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. (Karan Wahi) या स्टोरीमध्ये त्याने लिहिलं आहे कि, ‘एक लांबलचक गोष्ट थोडक्यात.. मी रस्त्यावरून उजवीकडे कट घेतला कारण माझ्यापुढे एक कार होती. त्या माणसाने मला शिवीगाळ केली आणि म्हणाला ”कट कैसे मारा?” आणि बडबडायला लागला कि, ‘तेरे जैसे दो कौडी के ऍक्टर्स बहोत देखे है”. मी त्याच्या स्कुटीची चावी घेतलेली परत केली आणि तिथून निघून गेलो’.

पुढे लिहिलंय, ‘मी जोपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलो नाही तोपर्यंत तो माणूस माझा पाठलाग करत होता. त्याने मला शिवीगाळ केली आणि म्हणाला, माझे पोलिसांशी संबंध आहेत’. करणने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसतंय की स्कूटरवर बसलेली एक व्यक्ती त्याचा पाठलाग करत आहे. (Karan Wahi) तसेच त्याच्यासोबत शाब्दिक वाद घालत आहे. हा वाद इथेच थांबला नाही तर या इसमाने अभिनेत्याच्या गाडीला धडकसुद्धा दिली. याविषयी करण म्हणाला, ‘हा माणूस मी चूक केली आहे असं म्हणतोय. पण खरंतर याने माझ्या गाडीचा पाठलाग केला आणि धडकसुद्धा दिली. मुंबई पोलीस कृपया मला मदत करा. हा त्याची चूक मान्य करून हे प्रकरण थांबवत नाहीये’.

(Karan Wahi)यानंतर करणने कॅमेरा त्या माणसाकडे वळवला आणि म्हणाला, ‘हा माणूस माझ्या मागे लागलाय. तू जेवढी मला शिवीगाळ केलीयस ना, तू थांब तुझ्याकडे आता पोलीसच येतील’. ही घटना घडून गेल्यानंतर थोड्या वेळाने करणने ही इंस्टास्टोरी डिलीट केली. मात्र तोपर्यंत या स्टोरीचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत होते. यासाठी करणने पुन्हा एक पोस्ट शेअर करत पोलिसांचे आभार मानले आहेत आणि लिहिले, ‘मी सुरक्षित आहे, मी घरी पोहोचलो आहे. पोलिसांशी माझं बोलणं झालंय. यावर तोडगा निघेल अशी आशा आहे. धन्यवाद मुंबई पोलीस’.