हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ITMS System । राज्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने एकूण ९ राष्ट्रीय महामार्गांवर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास २००० किलोमीटर अंतरावर हि सिस्टीम बसवण्यात येणार आहे. सध्या आयटीएमएस सिटीम हि पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर सुरु आहे. मात्र येत्या १५ महिन्यात ती मुंबई पुणेसह, नागपूर, मराठवाडा, कोकण अंडी पश्चिम महाराष्ट्रात विस्तारली जाईल.
कोणकोणत्या मार्गावर असणार ITMS सिस्टीम? ITMS System
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी विद्यमान शासकीय व्यवस्था अपुरी ठरत असल्याने शासनाने ९ मार्गावर ITMS सिस्टीम (ITMS System) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठाणे-आछाड, मुंबई-कागल, नाशिक-धुळे, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-छत्रपती संभाजीनगर, नागपूर-अकोला, नागपूर-चंद्रपूर तसेच नागपूर-देवरी अशा ९ प्रमुख महामार्गाचा समावेश आहे. या यंत्रणेचा मुख्य उद्देश म्हणजे महामार्गावरील वाहतूक शिस्तीत आणि व्यवस्थित ठेवणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पुरवणे आणि टोल वसुली जलद, पारदर्शक व अचूक पद्धतीने होण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करणे होय.
या सिस्टीमच्या (ITMS System) माध्यमातून आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, वाहनांचा वेग मोजण्यासाठी ‘ॲव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ राहणार आहे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘लेन डिसिप्लीन व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीम’देखील राबवली जाणार आहे. ९ महामार्गांवर आणि २ सर्कल्समध्ये ब्लॅक स्पॉट्सवर आयटीएमएसची अंमलबजावणी करण्यासाठी १३८७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पाच सर्कल्समध्ये इन्फ्रा फर्म अशोका बिल्डकॉन लिमिटेड (एबीएल) आणि तिची उपकंपनी अशोका प्युरस्टडी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीटीपीएल) यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमला देण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.