ITR File | आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचीच आता आयटीआर भरण्याची लगबग चालू झालेली आहे. अशातच 23 जुलै रोजी निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केला. आणि आयटीआर (ITR File) बाबत त्यांनी अनेक नवीन माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता भारतीय आयकर कायदा हा आधीपेक्षा खूपच सोपा आणि सरळ देखील होणार आहे. यासाठीची तयारी केंद्र सरकारने देखील चालू केलेली आहे.
अशातच आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे चेअरमन रवी अग्रवाल यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की, “पुढील सहा महिन्यांमध्ये आयकर कायदा अधिक सोपा होणार आहे.,यासाठी कायद्याची नवी आवृत्ती देखील आणली जाणार आहे. त्यानंतर आयटीआर (ITR File) दाखल करण्याची प्रक्रिया आधीपेक्षा खूपच सहज आणि सोपी होणार आहे. त्याचप्रमाणे इतर प्रक्रिया देखील सोप्या होणार आहेत.”
रवी अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे आता 66% करदात्यानी नव्या आयकर पद्धतीची स्वतःहून निवड केलेली आहे. या पद्धतीबाबत लोकांमध्ये आकर्षण निर्माण झालेले दिसून येत आहे. त्यामुळे आता येत्या काळात या नवीन आयकर पद्धती अंतर्गत त्यांना अधिक लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत यावर्षी जवळपास 4 कोटी आयटीआर (ITR File) दाखल झालेले आहेत. अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.
याबाबत सीबीटी प्रमुखांनी देखील सांगितले आहे की, आयटीआर सह इतर सगळ्या प्रक्रिया सुलभ आणि सहज होण्यासाठी सरकारने देखील आता जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. आयटीआर भरण्याची पद्धत जेवढी सहज आणि सोपी होईल, तेवढेच लोकांकडून कायद्याचे नियम पाळणे देखील शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे हे नियम सुलभ झाल्यानंतर खटल्यातही मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे.