ITR filing: भाड्याच्या घरात राहण्यावर मिळते इन्कम टॅक्समध्ये सूट, यासाठीच्या अटी काय आहेत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही अजून तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर लगेच रिटर्न फाईल करा. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले जाऊ शकते.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर प्रवेश करून ITR दाखल करण्याचे आवाहन केले आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे म्हणणे आहे की,” इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR भरणे अधिकृत वेबसाइट incometax.gov.in वर जाऊन केले जाऊ शकते.”

नवीन पोर्टलवर फॉर्म 26AS साठी सुलभ डाउनलोड सुविधा देखील आहे. फॉर्म 26AS, ज्याला वार्षिक स्टेटमेंट फॉर्म देखील म्हणतात. हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये करदात्याची सर्व टॅक्स संबंधित माहिती असते. जसे की, TDS, ऍडव्हान्स टॅक्स इ.

HRA शिवाय घराच्या भाड्यावर सूट
घरभाडे म्हणून दिलेल्या रकमेवर इन्कम टॅक्समध्ये सूट हवी असेल तर पहिली अट पगाराची आहे. तुमच्या पगारामध्ये हाऊस रेट अलाउंस (HRA) समाविष्ट आहे, जो इन्कम टॅक्सच्या कलम 10(13A) अंतर्गत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत टॅक्सफ्री आहे.

यासाठीच्या अटी आणि नियम काय आहेत जाणून घ्या
बहुतांश कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता हा त्यांच्या पगाराचा भाग मानला जातो. कर्मचार्‍यांना दिलेल्या घरभाड्यावरील कपातीचा दावा करण्याची तरतूद आयकर कायदा 1961 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याच वेळी, असे कर्मचारी आयकर कायद्याच्या कलम 80GG अंतर्गत भरलेल्या घर भाड्यावर सूट मिळण्याचा दावा करू शकतात.

तसेच, हा नियम सेल्फ एम्प्लॉयी असलेल्या लोकांना देखील लागू होतो, मात्र या सूटीचा लाभ मिळविण्यासाठी, काही नियम आणि अटी समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी कर्मचाऱ्याला आर्थिक वर्षात HRA मिळालेला नसावा.

HRA मध्ये सूट मिळण्याचा दावा करणारा करदाता कलम 80GG अंतर्गत भरलेल्या भाड्यावर कपातीचा दावा करू शकत नाही. तसेच, कलम 80GG अंतर्गत कपातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे शहरात कोणतेही घर नसावे. ज्या शहरात ऑफिस आहे किंवा व्यवसाय चालतो त्या शहरात पती/पत्नी, अल्पवयीन मुलाच्या किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावावर कोणतेही घर नसावे. दुसरीकडे, एखाद्या कर्मचाऱ्याचे शहरात जेथे तो काम करतो तिथे घर असेल तर तो कपातीचा दावा करू शकणार नाही.

Leave a Comment