कराड | पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी जयसिंह उर्फ बाळासाहेब राजेमहाडिक (तारळे, ता. पाटण) यांची तर व्हा. चेअरमनपदी धनंजय ताटे (ताबवे, ता.कराड) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी पार पडल्या.
पाटण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मावळते चेअरमन दिनकरराव घाडगे, जयसिंह उर्फ बाळासाहेब राजेमहाडिक, दिलीपराव मोठे अंकुश मोडे, वसंतराव जाधव, धनंजय ताटे, भानुदास सूर्यवंशी, अमजद हकीम, सौ. वंदना सावंत, सौ. कविता हिरवे, अशोकराव गजरे, आनंदा भोळे, नथुराम झोरे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण अर्बन बँकेने आपला नावलौकिक मिळवला आहे. येणाऱ्या काळात नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाने बँकेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अर्थवाहिनी म्हणून या बँकेचा नावलाैकिक व्हावा.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, टाटाचे कामगार नेते सुजित पाटील, तालुका दूध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, बाजार समिती सभापती रेखाताई पाटील, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, अर्बन बँकेचे मावळते चेअरमन दिनकरराव घाडगे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुभाषराव पवार आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले.