जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. त्यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
#जळगाव जिल्ह्यात आज आणखी अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. पैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे #Corona #Lockdown4
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) May 18, 2020
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगर, शाहूनगर, आर. आर. हायस्कुल परिसर याठिकाणचे अकरा बाधित, साईनगर, भुसावळ येथील तीन, भडगाव येथील एक, पाचोरा येथील एक व कोरपावली ता. यावल येथील दोन रुग्णाचा समावेश आहे
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 297 झाली असून त्यापैकी 77 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. आतापर्यंत 33 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमळनेर तालुक्यातील 65 रुग्णांची आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यांना अाज कोविड केअर सेंटर मधून दिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.