जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 334 रुग्णांची भर, एकूण बाधितांची संख्या 9183

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 334 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 9183 झाली आहे. आज दिवसभरात 204 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 5834 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2899 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 450 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 90, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 18, अमळनेर 19, चोपडा 7, पाचोरा 40, भडगाव 14, धरणगाव 42, यावल 1, एरंडोल 9, जामनेर 32, रावेर 7, पारोळा 2, चाळीसगाव 40, बोदवड 0, मुक्ताईनगर 7 अशी रूग्ण संख्या आहे.

आज जळगाव येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण व जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 30 खाटांच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पाटील इत्यादी उपस्थित होते.


Leave a Comment