जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या 878 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 40165 झाली आहे. त्याच प्रमाणे 707 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9988 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 29168 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 18 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 1008 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जवळपास 4000 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 150, जळगाव ग्रामीण 39, भुसावळ 51, अमळनेर 126, चोपडा 124, पाचोरा 37, भडगाव 35, धरणगाव 48, यावल 19, एरंडोल 34, जामनेर 56, रावेर 22, पारोळा 34, चाळीसगाव 25, मुक्ताईनगर 19, बोदवड 40 अशी रुग्ण संख्या आहे.
जळगाव येथे माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी अभियानाचा शुभारंभ पाळधी ता. धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी नियुक्त पथकांमार्फत करण्यात आली.
मात्र अभियानाची सुरवात प्रसंगीच ही योजना सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यात पूर्णपणे फसली. ह्या अभियानांतर्गत जर लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी अशी गर्दी जमवत , बेजबाबदारपणे जर आरोग्य तपासणी करत असतील, तर मग निरोगी माणसे देखील कोरोना बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोरोना संसर्गमुळे एकूण मृत्यू एक हजारच्या पुढे गेल्या मुळे शासनाने यापुढे सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल.
#जळगाव जिल्हा #कोरोना अपडेटस 15 सप्टेंबर @MiLOKMAT @SakalMediaNews @punyanagari @MarathiDivya @deshdoot @eJanshakti @Tarunbharatjal_ @Saamanaonline @LoksattaLive @mataonline @GulabraojiPatil @JalgaonDM@DDSahyadri @AIRJALGAON @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @saamTVnews pic.twitter.com/S9zpMBjnIb
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 15, 2020
सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकारी यांना विसर पडला.
#माझेकुटुंबमाझीजबाबदारी मोहिमेतंर्गत पाळधी येथे पालकमंत्री @GulabraojiPatil जिप अध्यक्षा रंजनाताई पाटील, @JalgaonDM श्री. राऊत यांच्या उपस्थितीत आरोग्य पथकांमार्फत नागरिकांची तपासणी करण्यात आली @CMOMaharashtra #जळगाव @AamchJalgaon pic.twitter.com/I97sjqeQIZ
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 15, 2020