जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 304 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 7796 झाली आहे. आज दिवसभरात 174 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4826 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 2579 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 391 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एरंडोल 4,आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 107, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 19, अमळनेर 10, चोपडा 16, पाचोरा 21, भडगाव 5, धरणगाव 18, यावल 6, जामनेर 21, रावेर 29, पारोळा 5, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 09, बोदवड 4 अशी रूग्ण संख्या आहे.
जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने सात हजारांचा टप्पा नुकताच पार केला आहे. जिल्ह्यात दिवसाला रुग्ण त्रिशतकने वाढण्याची ही तिसरी वेळ आहे.
शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेतर्फे सोमवारपासून प्रभाग निहाय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. शहरातील नागरीकांना कोविड-१९ करीता ६ झोनमध्ये स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 174 रूग्णांनी #कोरोना वर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 4826 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2579 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 304 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 7796 झाली असून आतापर्यंत 391 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. pic.twitter.com/KoNiLDoEEE
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 19, 2020
#जळगाव शहरातील नागरिकांनी प्रभागनिहाय स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांचे आवाहन #stayhome #lockdown @SureshBhole1 @WeAreJalgaon @JalgaonDM pic.twitter.com/F7IinsywkE
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 18, 2020