जालना प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील आष्टीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गर्भवतीला तुमच्या बाळाचा पोटातच मृत झाला आहे त्यामुळं बाळ काढण्यासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये जावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र रूग्णालयात जात असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली आणि बाळ सुखरुप जन्माला आलं. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी केलेल्या या हलगर्जीपणावरून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करीत आहे.
परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे राहणारे जगताप कुटुंब. आपल्या गर्भवती मुलीच्या पोटात त्रास होत असल्यानं त्यांनी मुलीला आष्टीतल्या सरकारी रूग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना सांगितली बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचं ऐकून नातेवाईकांना धक्का बसला. त्यानंतर महिलेचे प्राण वाचवायचे असतील तर बाळाला बाहेर काढावं लागेल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सदर कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन गाडीने दुसऱ्या रूग्णालयात जात असतांना रस्त्यातच महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. घडलेल्या प्रकारावर महिलेच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.