पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे.
जलनेती हा मुख्यपणे प्रतिबंधात्मक उपाय आहे. जलनेती हा कोरोनावरचा उपाय नाही मात्र कोरोना होऊ नये म्हणूनच हा उपाय आहे असं केळकर यांनी सांगितले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी दररोज दिवसातून दोन वेळा जलनीती करतात. त्यामुळे रुग्णालयातील कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही असं केळकर यांनी म्हटलंय. जलनेतीमुळे नाकातून होणाऱ्या जंतू संसर्गाला आला बसतो असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
दरम्यान, जलनेतीसाठी लागणारे भांडे केवळ १५० ते २०० रुपयांमध्ये मिळते. कोणत्याही योग सेंटरवर किंवा अगदी अमेझॉनवरही हे उपलब्ध आहे. दिवसातून दोन वेळा जलनेती केल्यास कोरोना होणार नाही असे डॉक्टरांनी म्हटले आहे. यासाठी जलनेती च्या भांड्याचा वापर करून एका नाकपुडीतून पाणी सोडून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढायचे आहे.